पोस्ट्स

तीर्थक्षेत्र

आजोबांच्या म्हणजे अण्णांच्या मांडीत बसून शंभुराजे आजोबांनी सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकत होते. शंभूराजे म्हणजे तीन-साडेतीन वर्षाचा छोटा शंभू! त्याचं खरं नाव शुभम् पण शंभूच म्हणायचे सगळे त्याला . सकाळी आईचं सगळं काम आवरेपयर्तं शंभू आजोबांबरोबर खेळायचा .नंतर आजी त्याला जेवण भरवायची. तोवर त्याच्या आईचं अजून थोडं काम व्हायचं. शंभूराजे नंतर आपल्या आईच्या स्कूटीवर बसून बाहेर पडायचे. बाजारामध्ये चक्कर मारून भाजी, फळे, औषधे वगैरे कायकाय हवे ते घ्यायचे माय लेक. विनय  म्हणजे  शंभुचा बाबा क्वचितच भेटायचा त्याला. त्याची फिरतीची नोकरी होती. लांब लांब जावं लागायचं त्याला विमानाने. इकडे वाईमध्ये आई-बाबा एकटे ,तिकडे पुण्यामध्ये बायको मेधा आणि मुलगा एकटे, मग त्याला खूप काळजी वाटायची सगळ्यांची .म्हणून बायको मुलाला वाईतच ठेवलं होतं ,आई-वडिलां जवळ. मेधाचं माहेरही वाईतच होतं. त्यामुळे त्याला बिनधास्त कुठेही फिरता यायचं .महिन्यातले चार-पाच दिवस कसेतरी भारतात ,त्यातले एक दोन दिवस वाईत घालवायला मिळायचे त्याला. शंभूचा दिवस तर सगळा मजेत जायचा पण संध्याकाळी त्याची आई कावरीबावरी व्हायची ,आजी व्याकूळ व्हायची ,आज

क्षमापना

आज पर्युषणाचा शेवटचा दिवस ! एकमेकांची मोकळया मनाने क्षमा मागायचा दिवस ! मागील आयुष्यात झालेल्या चुकांचा पश्चाताप करून एकमेकांची क्षमा मागायचा दिवस! देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माझा धरलेला हात तू आजवर नाही सोडलास. नेकीने संसार करत राहिलास आणि पाय जमिनीवर ठेवून चाललास. माझ्या पूर्व आयुष्यात तू कधीच नाही डोकावलास. इतका कसा रे तू संयमाने राहिलास! आज सांगते तुला, प्रियकराने पाठ फिरवल्या नंतर मी होता रडून रडून केला बोभाटा . त्याला खोटारडा ,बेईमान ठरवण्याचा मी केला आटापिटा.  त्याला परत मिळवण्याचा प्रयत्न कितीतरी वेळा केला. तुझ्याशी लग्न करतांनाही त्याने माझ्या मनाचा ताबा कधीच नाही सोडला. तुझ्यामाझ्या मीलनावेळी तोच सोबत होता माझ्या, जेंव्हा तू अनुभवत होतास स्त्रीचा स्पर्श पहिलावहिला, तेव्हा हे काय लक्षात आलं नसेल का तुला? पण तू नेकीने संसार करत राहिलास आणि पाय जमिनीवर ठेवून चाललास. इतकी प्रेम करत होते मी त्याच्यावर पण त्याच्यासाठी आजन्म वाट पाहण्याचा संयम नाही जमला मला. शरीराचे बंड नाही मोडता आलं तारुण्याला . तुझ्या हातात हात देताना मी फक्त व्यवहार पाहिला. आईबापांच्या  डोक्य